राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):- महिलांना सन्मान देण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे. लाडकी बहीण योजने बरोबरच एस.टी प्रवासाला ५० टक्के सवलत देत महिलांचा ख-याअर्थाने सन्मान झाला. यामुळे लाडक्या बहिणी सदैव महायुती मधील सर्व भावांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या आहेत असा विश्वास रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.धनश्री विखे पाटील यांनी केले.
शिर्डी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ साकुरी गावातील महिलांच्या भेटीगाठी घेवून त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु करुन महिलांना सक्षम करण्याचे काम सुरु केले आहे. महिलांची प्रगती झाली तर, कुटूंबाची होती. आणि समाज पुढे जाण्यासही मदत होते. त्यामुळेच राज्य सरकारने महिलांच्या विकासाकरीता अनेक योजना जाहिर केल्या. बस प्रवासामध्ये पन्नास टक्के सुट, विद्यार्थींनींना मोफत शिक्षण आणि बचत गटांच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी लखपती दिदि योजना सुरु केली असल्याची माहीतीही त्यांनी याप्रसंगी दिली.
ना.विखे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डी मतदार संघाच्या विकास प्रक्रीयेला मोठी गती मिळत असून, मतदार संघात पायाभूत सुविधाही उपलब्ध झाल्याने नागरीकांनाही त्याचा मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाले आहे. येणाऱ्या काळात मंत्री विखे पाटील यांना पाठबळ देण्याचे काम सर्वांनी करावे आणि त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणावे असे आवाहन सौ विखे पाटील यांनी केले.