कोल्हार ( वार्ताहर ) :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल मंगळवार दि. ४ एप्रिल २०२३ रोजी गव्हाची १९ क्विंटल आवक झाली. गहू कमीत कमी २००० रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त २२५१ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला. गहू सरासरी २१५० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला.
तसेच कोल्हार उपबजारात सोयाबीनची १० क्विंटल आवक झाली. सोयाबीन कमीत कमी ५१७१ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त ५२४६ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. सोयाबीन सरासरी ५२२५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आली. मक्याची १ क्विंटल आवक झाली. मका सरासरी १८९९ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात आला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.





