श्रीरामपूर दि.१ (प्रतिनिधी):-जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेआहे.गावपातळीवर योजनेची अंमलबजावणी करताना गावात जावून योजनेतील त्रृटी दूर कराव्यात,वेळ पडली तर पुन्हा सर्वेक्षण करा,एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्याची सक्ती मात्र करू नका आशा सूचना महसूल पशुसंवर्धन तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे-महसूल पशुसंवर्धन तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनांच्या कामाचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी गावनिहाय घेतला.आ.लहू कानडे प्रांताधिकारी अनिल पवार तहसिलदार प्रशांत पाटील तसेच जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्यांसह भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पठारे मारूती बिंगले गणेश राठी नानासाहेब शिंदे शरद नवले यांच्यासह विविध गावातील सरपंच कार्यकर्ते उपस्थित होते.
योजनांचा आढावा घेतल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी साधलेल्या संवादात मार्गदर्शन करताना अधिकार्यांनी या योजनेचे काम अतिशय जागृतपणे करण्याचे सूचित केले.अनेक गावात ग्रामस्थ पदाधिकारी आणि शासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव दिसत असल्याने योजनेच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधून योजनेचे सर्वेक्षण वेळ पडली तर पुन्हा करा परंतू केवळ पाईप टकाण्याची घाई करू नका आशा सूचना त्यांनी दिल्या.
या योजनेकरीता जिल्ह्यात साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.राजकीय भूमिकांच्या पलीकडे जावून लोकांसाठी या योजनेचे काम झाले पाहीजे आशी अपेक्षा व्यक्त करताना शासनाने या योजनेकरीता दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चाळीस कंपन्याचा समावेश असताना एकाच कंपनीचे पाईप खरेदी करण्यासाठी आग्रह धरू नका आशा स्पष्ट सूचना मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.योजनेसाठी जागा मिळण्याबाबत असलेल्या प्रश्नात अधिकार्यांनी गावात जावून लक्ष घालावे असेही त्यांनी सांगितले.
महसूल विभागाच्या माध्यमातून महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून शेतशिवार पाणंद रस्ते तातडीने मोकळे करण्यासाठी पुढील तीन महीन्यात कार्यवाही करावी.मोजणीचे प्रकरण निकाली काढण्यासाठी जिल्ह्याकरीता स्वंतत्र एजन्सी नेमण्यात आली असून रोव्हर तंत्रज्ञानाच्या साह्याने एक महीन्यात मोजणी पूर्ण करून नकाशे घरपोच देण्यासाठी महसूल विभागाने तयारी केली असून श्रीरामपूर करीता चार मशिन उपलब्ध देण्यात आले असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात असून वाळू धोरणाची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल.आता वाळू लिलाव पूर्णपणे बंद करण्यात आले असल्याने सरकारच घरपोच वाळू देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.शेती महामंडळाच्या जमीनीमध्ये झालेल्या गोंधळाबाबत चौकशी सुरू असून अकारी पडीत जमीनी शेतकार्याना मिळाव्यात म्हणून प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.आ.लहू कानडे यांनी बैठकीत महत्वपूर्ण सूचना करून मार्गदर्शन केले.
सध्या सामाजिक वातालरण बिघडविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.लव्ह जिहाद बाबत अधिकार्यांनी जागृत राहून दोषी व्यकतींवर कठोर कारवाई करावी यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्याची वेळ येवू देवू नका असे मंत्री विखे पाटील यांनी अतिशय गांभीर्याने स्पष्ट केले.





