7.3 C
New York
Thursday, December 12, 2024

Buy now

spot_img
spot_img

विज्ञान प्रदर्शातून विद्यार्थाच्या संशोधन वृतीला प्रोत्साहन – सौ. शालिनीताई विखे पाटील प्रवरेच्या वतीने गणित,विज्ञान आणि कला प्रदर्शन

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कला गुणांना संधी देण्याचे काम नेहमीचं होत असते. विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.

लोकनेते पद्मभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्ह्य परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि विश्वस्त सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यामिक विद्यालयात संस्था अंतर्गत दोन दिवसांचे विज्ञान,गणित आणि कला प्रदर्शन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा शिक्षण अधिकारी अशोक कडूस,राहाता शिक्षणा अधिकारी राजेश पावसे,संस्थेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे, भाऊसाहेब विखे मुख्याध्यापक एस एम निर्मळ आदींसह विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सौ.विखे पाटील म्हणाल्या प्रवरा शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी घडवण्याचं काम होत आहे. संस्थेतून शिकून बाहेर गेलेले विद्यार्थी देशात आणि परदेशातही आहेत. शालेय शिक्षणा बरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थी जगात कुठेही मागे राहू नये यासाठी विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव दिला जातो. गणित विज्ञान आणि कला या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाला संधी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आज सर्व माध्यमातून विद्यार्थ्यांना माहीतीचे स्त्रोत उपलब्ध झाले आहेत.वेगवेगळ्या क्षेत्रातील माहीती संकलीत करून विद्यार्थी आपल्या संकल्पनेला दिशा देण्याचा प्रयत्न करीत असल्याने आशी प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे सौ. शालिनीताई  विखे पाटील म्हणल्या.संस्थेचे अध्यक्ष आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्थेतील विद्यार्थ्या करीता प्रोत्साहनपर उपक्रम सुरू केले आहेत. अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये संस्थेचा नावलौकीक मोठा करीत असून विद्यार्थ्यांनी शिक्षणा सोबतच आपले कला गुण जपून संशोधनातून पुढे जावे अशी अपेक्षाही सौ विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना विद्यार्थ्यांनी संशोधनातून आपली वेगळी ओळख निर्माण करावी ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील अतिशय चांगल्या प्रकारचे संशोधन आणि मॉडेल्स हे उभे करू शकतात हेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांनी इस्ञो, नासा, असर या संशोधन संस्थेची माहिती जाणून घेऊन यामध्ये चांगले करिअर घडविण्यचा प्रयत्न करावा विज्ञाना वरती श्रद्धा ठेवून जिज्ञासू वृत्तीने पुढे जाण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी राजेश पावसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शनामध्ये इयत्ता पहीली ते इयत्ता बारावीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आरोग्य, जीवन प्रणाली, पर्यावरण संवर्धन, शेती तंत्रज्ञान, बदलते हवामान, जमीन आरोग्य, निसर्ग- पर्यावरण संवर्धन, माहीती तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, दळण-वळण, महाराष्ट्रातील गडे किल्ले, भारतीय संस्कृती आदीविषयी विविध विज्ञान प्रयोग, पोस्टर प्रदर्शनात संस्थेची प्राथमिक,माध्यमिक आणि कनिष्ठ अशा चार गटातून प्रदर्शनामध्ये ३०० विविध उपकरणे आणि कलाकृती ठेवण्यात आल्या आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!