spot_img
spot_img

उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीरामपूर  तालुक्यातील हरेगाव-उंदिरगाव रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव-उंदिरगाव रोडवर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची संजय ससाणे (वय ५१) या इसमास धडक बसल्याने त्यात ते जखमी झाले. 

या अपघातात ससाणे यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला होता. त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले.

साखर कारखान्यांसाठी उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक हे मर्यादेच्या पलीकडे माल भरतात.कधीकधी एका ट्रॅक्टरला दोन-तीन ट्रॉल्या देखील जोडल्या जातात. ट्रक कलंडायला लागेपर्यंत भरला जातो. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अशाप्रकारे निष्पाप लोकांचा बळी त्यामध्ये जात आहे.

दरम्यान श्रीरामपूर शहरातच आरटीओचे कार्यालय आहे मग हे आरटीओचे अधिकारी कर्मचारी झोपले काय? त्यांना ही बेकायदेशीर वाहतुक दिसत नाही का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!