पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकाला अमानुष मारहाण झाली असुन, मारहणीचा सर्व प्रकार सी.सी.टि.व्हीत कैद झाला आहे. या घटनेतील सहा जणांवर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुपा पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती अशी की, गुरूवार दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी दहा ते आकरा वाजण्याच्या दरम्यान जखमी दिनेश प्रमोद ऊरमुडे (वय २४) रा. भोयरे पठार ता. नगर जिल्हा आहिल्यानगर यास सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये सहा व्यक्तींनी अमानुष मारहाण केली असुन मारहाण करतानाचे सर्व प्रकार सी.सी सी टि व्हीत कैद झाला आहे. सदर व्यक्तीस पाच सात जण लाथा बुक्या लाकडी दांडक्यानी मारहाण करताना दिसत असुन या मारहाणीत सदर व्यक्ती गंभीर जखमी झाली असुन त्यावरती पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालु असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत प्रमोद ऊरमुडे यांनी सुपा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, आरोपी सचिन रमेश मुठे, प्रशांत दिलीप आंबेकर, पवन रमेश मुठे, साहील भाऊसाहेब आंबेकर, ज्ञानदेव दतु कार्ले सर्व रा. भोयरे पठार ता. जि. अहिल्यानगर, दत्ता पवार (पूर्ण नाव माहीत नाही) रा. पिंपळगाव कौडा ता.जि. अहिल्यानगर यांनी माझ्या मुलांना मारहाण केली अशी फिर्याद दिली आहे.
सुपा पोलिसांनी प्रमोद ऊरमुरे यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींवर भारतीय दंड सहिता च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक जेजोट मॅडम पुढील तपास करत आहेत.



 
                                    
