लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हातमध्ये प्रसिद्ध असलेल्या लोणी बुद्रुक येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेस आज पासून प्रारंभ होत आहे या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांंबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या ठिकाणीभाविकांसाठी असणार आहे.
या निमित्ताने शनिवारी सकाळी सात वाजता मूर्ती अभिषेक माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील उपस्थित असणार आहे.
दुपारी ४ वाजता म्हसोबा महाराजांच्या काठीशी भव्य दिव्य मिरवणूक, रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्यांची दंगल, सोमवार दि. १६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बैलगाडा शर्यत, त्याचबरोबर शनिवारी राञी ८ वाजता तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा आणि रविवारी सविताराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा हा मोफत होणार आहे.
त्याबरोबरच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री प्रदर्शन, खाद्य महोत्सव आणि पशुपक्षी प्रदर्शन अर्थात स्वयंसिध्दा याञा २०२४ चा प्रारंभ शनीवार पासून होणार आहे. यात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.



 
                                    
