मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा ):-उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देवेंद्र फडणवीस भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करून उपस्थित राहण्याच्या सूचना करणार असल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतरच मंत्रिपदांवर शिक्कामोर्तब होईल. याचदरम्यान, भाजपच्या संभाव्य मंत्र्याची यादी समोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
कोकण-
1. रविंद्र चव्हाण
2. नितेश राणे
1. मंगलप्रभात लोढा
2. आशिष शेलार
3. अतुल भातखळकर
पश्चिम महाराष्ट्र
1. शिवेंद्रसिंहराजे भोसले
2. गोपीचंद पडळकर
3. माधुरी मिसाळ
4. राधाकृष्ण विखे पाटील
विदर्भ
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. संजय कुटे
उत्तर महाराष्ट्र
1. गिरीश महाजन
2. जयकुमार रावल
मराठवाडा
1. पंकजा मुंडे
2. अतुल सावे



