अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यासाठी इनजेनियस लीडरशिप समिट देशपांतळीवरील आयकॉनिकलीडर अवॉर्ड २०२४ या वर्षी गोव्यातील विंडफ्लॉवर रिसॉर्ट आणि स्पा वर्का या पंचतारांकित रिसॉर्ट येथे झाला. २०२४ चा देशपातळीवरील जिल्हा बँकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उत्कृष्ट चेअरमन म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले यांना २०२४ बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर चा पुरस्कार राष्ट्रीय सहकारी संघ,नवी दिल्लीचे चेअरमन माजी खा.दिलीप संघवी यांच्या हस्ते देण्यात आला.
याप्रसंगी गोवा विधानसभा अध्यक्ष अनंत शेट, गोवा राज्याचे सुभाष फलदेसाई आदी उपस्थित होते. पुरस्कार स्विकारल्यानंतर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार कर्डिले म्हणाले,जिल्हा बँकेवर विश्वास ठेवून रुपये दहा हजार कोटीच्या वर ठेवीददरांनी ठेवी ठेवल्या. जिल्हा बँक व सामाजिक कार्याच्या माध्यमातून शेतकरी व समाजातील शेवटचा घटकांची सेवा करण्याचे कार्य केल्याने मला हा पुरस्कार मिळाला.



