11 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

आज मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता राज्य सरकार आज राज्यपालांकडे खातेवाटपाचे पत्र देणार कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता

नागपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- आज मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता राज्य सरकार आज राज्यपालांकडे खातेवाटपाचे पत्र देणार कोणत्या मंत्र्यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला.भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली.

भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्याची काल रात्री उशिरा खातेवाटपसंदर्भात बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकार आज राज्यपालांकडे खातेवाटपाचं पत्र देणार आहेत. आज राज्यपाल यांना नवनिर्वाचित मंत्री कोणती खाते कोणाला असणार याचे पत्र दिले जाणार असून त्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता कोणत्या नेत्यांना कोणती खाते मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!