23.7 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

खातेवाटपाचा अखेर ठरलं? संभाव्य यादी समोर

मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्रातील महायुती सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे.

यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता कोणाला कोणती मंत्रि‍पदाची कोणती खाती मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान आता संभाव्य खातेवाटपाची माहिती समोर आली आहे.

गेल्या मंत्रिमंडळातील महत्वाची खाती त्या-त्या पक्षाकडेच राहणार असल्याची शक्यता आहे. भाजपकडे गृह खाते राहणार आहे. तर शिवसेनेकडे नगरविकास खाते राहणार आहे. अजित पवार गटाचे अर्थ खाते कायम राहणार आहे.

भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, उर्जा खाते राहणार आहे. शिवसेनेचे उत्पादन शुल्क खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं जाणार आहे. भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोणाला कोणती खाती मिळणार?

(भाजप)

गृह

महसूल

सार्वजनिक बांधकाम

पर्यटन

ऊर्जा

(शिवसेना)

नगरविकास

गृहनिर्माण

(राष्ट्रवादी काँग्रेस)

अर्थ

महिला आणि बालविकास

उत्पादन शुल्क

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!