16.6 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

सरकार कुठेतरी कमी पडतंय ! मस्साजोग प्रकरणी खा. नीलेश लंके यांची प्रतिक्रिया 

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसून सरकार कोठेतरी कमी पडत असल्याची प्रतिक्रिया खा. नीलेश लंके यांनी दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत खा. नीलेश लंके यांनी मस्साजोग येथे जात देशमुख परिवाराने सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. खा. बजरंग सोनवणे,आ. राजेश टोपे आ. संदीप क्षिरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, घटना घडून इतके दिवस लोटले तरी आजूनही सरकारने कोणते ठोस पाऊल उचललेले नाही. याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडत आहे. परभणी, बीडच्या घटना पाहिल्या तर या अतिशय दुर्देवी घटना घडलेल्या असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, संसदेचे अधिवेशन आटोपून खा. नीलेश लंके हे शुक्रवारी सायंकाळी दिल्लीहून मुंबईत पोहचले. मुंबईहून पुणे येथे मुक्काम करून पुण्याहून ते शरद पवार यांच्यासमवेत मस्साजोग येथे पोहचले.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!