संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर तालुक्यात मानवावर बिबट्याचे हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या बिबट्यांची तात्पुरत्या स्वरूपात नसबंदी करण्यात यावी अशी मागणी महायुतीचे आ. अमोल खताळ यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे.
संगमनेर तालुक्यामध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे तसेच गिनी गवत व मकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे बिबट्याला लपण्या साठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत चालली असून सातत्याने नागरिकांवर या बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाणही वाढत आहे त्यामध्ये अनेक जण जखमी झाले असून नागरिक जखमी आणि मृत झालेले आहेत.
हे थांबविण्यासाठी बिबट्यांची तात्पुरत्या स्वरूपात नसबंदी करण्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात याव्यात अशी मागणी संगमनेरचे महायुतीचे आ. खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर योग्य ती कार्यवाही करत उपाययोजना केल्या जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.