या आंदोलनाचे नेत्तृत्व नामदेव चांदणे,रामभाऊ केंदळे,देवराम सरोदे,बाळासाहेब बागूल,हनिफभाई पठाण,प्रकाश तिजोरे,पोपट सरोदे, सुधीर वैरागर,दासूभाऊ आढागळे,बाबासाहेब शेलार,विजय वडागळे आदी मान्यवरांनी केली.
वरखेडच्या महालक्षीदेवी याञेत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सकल मांतग समाजाने केला एक तास रस्ता रोको
नेवासा फाटा: (प्रतिनिधी)– महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या वरखेड (ता.नेवासा) येथील महालक्ष्मी देवी यात्रेनिमीत्त याञेकरुंना सोयी सुविधा उपलब्ध होण्याकामी गेल्या दोन महिन्यापूर्वी मातंग समाजाने दिलेल्या निवेदनावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ सोमवार (दि २७) दुपारी १२ वाजता नगर – औरंगाबाद महामार्गावरील खडका फाटा येथे सकल मातंग समाजाच्यावतीने सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले
यावेळी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्विकारण्यासाठी नेवासा तहसिलदार वेळेवर न आल्यामुळे मोर्चेकऱ्यांनी नेवासा तहसिलदारांच्या निषेधाच्या घोषणा देवून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या मोर्चाप्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणात मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वरखेड येथील तिर्थक्षेञ लक्ष्मीदेवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात व प्रचंड भाविक भक्तांच्या उपस्थित साजरा केला जात असून राज्यासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हजेरी लावत असतात या भाविक भक्तांना शासनस्तरावर सोयी सुविधा मिळण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून
प्रशासनस्तरावर मातंग समाजाच्यावतीने विविध मागण्यांचा पाठपुरावा केलेला असतांनाही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असून केवळ वरखेड देवस्थान हे मागासवर्गीय दलित समाजाचे आराध्य दैवत असल्याकारणाने याकडे वर्षानुवर्ष प्रशासन दुर्लक्ष करून जातिवाद करत असल्याचा आरोप यावेळी मोर्चाकऱ्यांनी निवेदनात करुन आपला रोष व्यक्त आहे.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी निवेदनात यात्रेनिमित्त येणाऱ्या भावीक – भक्तांना आपली यात्रा साजरी करण्यासाठी मंदिर परिसरात जागा उपलब्ध करुन देवून मंदिर परिसरातील एक किलोमीटर पर्यंतच्या शेतजमिनी आरक्षित करण्यात याव्यात व गावाच्या बाजूला असलेली मोठी जागा खुली करुन यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविक – भक्तांना पुरेसे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देवून भाविकांचे आरोग्य राखण्यासाठी फिरत्या दवाखान्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच यात्रा उत्सव काळात मंदिर परिसरातील मटका,दारू,जुगार,सोरट इत्यादी अवैद्ध धंदे बंद सुरु न करण्याची मागणी यावेळी केली
तसेच शिरसगाव ते वरखेड या परिसरातील रस्ता अरुंद असल्याकारणाने त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा रस्ता साफसफाई करून खड्डे बुजविण्यात येवून याञा काळात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी आंदोलकांच्यावतीने करण्यात आली.या आंदोलनाप्रसंगी सकल मातंग समाज मोठ्या संख्येने आंदेलनात सहभागी झालेला होता मोर्चाकऱ्यांचे निवेदन तहसिलदांरानी स्विकारले यावेळी नेवासा पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक भास्कर गावंडे,पो.कॉ.राजू केदार,महीला पोलीस हवालदार सविता उंदरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.आंदोलन सुमारे एक तास सुरु असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
आंदोलनात पोतराजांनी डफडे वाजवत याञेनिमित्त प्रशासनाने भाविकांना सुख – सुविद्या उपलब्ध करुन देण्याची मागणी यावेळी केली





