कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा)-अहिल्यानगर – मनमाड राज्य मार्गावरील प्रवरा नदीवरील बंद पडलेले समांतर पुलाचे काम, सध्या एकाच पुलावरून होत असलेली जड वाहतूक, तसेच साखर कारखान्याकडे क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून डबल ट्रॅक्टर ट्रेलर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी कार्यरत असलेल्या पुलावर नादुरुस्त अवस्थेत उभे रहात असल्याने तर कधी कधी पुलावर अपघातामुळे अडकून पडलेले वाहनांमुळे या ना त्या अनेक कारणामुळे गेले काही दिवसापासून कोल्हार- भगवतीपुरचे नागरिक वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चांगलेच हैराण झाले असून ही वाहतूक कोंडीची समस्या कधी सुटणार हा देखील सवाल करीत आहेत.
आज शनिवारी जोडून आलेल्या सुट्ट्या तसेच वर्षा अखेरीमुळे शिर्डीहून शनिशिंगणापूर कडे जाणाऱ्या वाहनांची वाढती संख्या त्यातच पुलावर सुरू असलेले रंग देण्याचे कामामुळे लावलेले बॅरिगेट व त्यामुळे होणारी एकेरी वाहतूक व रस्त्यातच नादुरुस्त होऊन बंद पडलेला ऊस वाहतुकीचा डबल ट्रेलर या सर्वामुळे दुपारपासून वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली. या वाहतूक कोंडीमुळे नगर मनमाड राज्य मार्गावर नगर व मनमाडच्या दिशेने दोन्ही बाजूने वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर रांगा लागलेल्या दिसत होत्या. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ट्रॅफिक पोलीस देखील न आल्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढतच गेली त्यातही दुचाकीस्वार या वाहतूक कोंडीतून रस्ता काढत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती.
यामुळे कोल्हारकरांना रस्ता ओलांडणे देखील धोक्याचे वाटत होते. एसटी बसेस दोन ते तीन तास उशिराने नियोजित स्थळी पोहोचत होत्या त्यामुळे प्रवाशांचे देखील खूपच हाल झाले. साई भक्त वैशाली भक्त देखील जाम वैतागले होते चार ते पाच तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाल्यानंतर कोल्हारकरांनी मोकळा श्वास घेतला. मात्र वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीला वाहन चालका सहन कोल्हारकर नागरिक देखील जाम वैतागले असून हा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम सुटावा व वाहतूक सुरळीत नियमितपणे सुरू राहावी अशी मागणी कोल्हारकर नागरिक करीत आहे मागणी होत आहे.