नेवासे( जनता आवाज वृत्तसेवा ):- शिर्डी पाठोपाठ जगप्रसिद्ध असलेल्या शनिदेवाच्या दर्शनासाठी दररोज गर्दी वाढत असून या वेळी शनि अमावास्येचा पेक्षा जास्त शनि भक्तांची गर्दी नाताळ तसेच सलग आलेल्या सरकारी सुट्या शैक्षणिक सहलीमुळे शनिशिंगणापूरला दिड लाखांपेक्षा जास्त शनि भक्तांनी दर्शन घेतले.कालच केंद्रीय मंत्री पियुष गोयल शिंगणापूर दर्शन घेऊन गेले.
भक्तांनाकडून शनिमूर्तीला तेल वाहून अभिषेक ,पूजन तसेच चौथाऱ्यावर जावून दर्शन त्याच बरोबर देवस्थान वतीने रांगा नियोजन प्रसाद वाटप योग्य नियोजन शिंगणापूर येथे पानसनाला, सुशोभीकरण भव्यदिव्य रोशनाई देवस्थानच्या वतीने करण्यात आलेल्या सुविधा यामुळे भक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी येथील लटकूची साडेसाती थांबता थांबेना एजंट कडून शनिभक्तांना होणार त्रास थांबताना दिसतं नाही.
चक्क येथील कार्यरत पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांन देखत लटकू हुल्लडबाजी करतात यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनानी कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र टीम नेमली पाहिजे.
नाताळ तसेच सलग आलेल्या सुट्यांमुळे शैक्षणिक सहली व सलग चार दिवसांपासून मोठी गर्दी शनि शिंगणापूर होत असून देवस्थान वतीने भक्तांना पाणी, स्वच्छतागृह, व दर्शनासाठी रांगा कर्मचारी सुविधा देत असतात –
भागवत बानकर (शनिशिंगणापूर देवस्थान अध्यक्ष.)