8.4 C
New York
Saturday, October 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

कोल्हार खुर्द येथे रंगला भव्य कुस्त्यांचा हंगामा

कोल्हार खुर्द (वार्ताहर):  राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे गुढीपाडवा निमित्ताने झालेल्या यात्रेमध्ये सुंदर असा सोंगाचा कार्यक्रम होऊन कुस्त्यांचा जंगी हंगामा पहावयास मिळाला.

कोल्हार खुर्द येथे गुढीपाडव्याला भव्य अशी यात्रा भरते.या यात्रेमध्ये सोंगे हे महत्वाचे आकर्षण असते.सोंगाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मोठा कुस्त्यांचा हंगामा होत असतो. यावर्षी बिरोबा महाराज हंगामा कमिटीने उत्कृष्ट असे नियोजनबद्ध कुस्त्यांचे नियोजन करून जिल्हा तसेच राज्य पातळीवरील कुस्तीपटूंना आमंत्रित करून कुस्ती हागाम्यांची रंगत वाढवली.

 यावेळी या हागाम्यासाठी महिला कुस्तीगीरांनीही हजेरी लावली.त्यामुळे कार्यक्रमाची रंगात वाढली.परिसरात झालेल्या बहुतेक हागाम्यांमध्ये महिला कुस्तीपटूंनी हजेरी लावण्याची ही पहिलीच वेळ असू शकते.संभाजीनगर येथूनही काही मल्ल या कुस्त्यांच्या फडात सामील झाले होते.
या वेळी काही नवीन तरुणांनी या कार्यक्रमाची सूत्रे हातात घेतल्याने नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या मानसिकतेतून भव्य असा कुस्त्यांचा हंगामा भरविला .आंतरराष्ट्रीय मल्ल प्रशिक्षक नायकल यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन केले. एक हजार ते अकरा हजार व एक्कावन्न हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ,ढाली व चांदीच्या गदा अशी बक्षिसांची उधळण करण्यात आली.
कोल्हार खुर्दच्या इतिहासात पहिल्यांदा असा कुस्त्यांचा कार्यक्रम झाल्याने परिसरात याचे कौतुक होत आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!