कर्जत (प्रतिनिधी) : गावात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायतीचा रोटरी क्लब आॅफ कर्जत सिटीकडून नुकताच सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लब आॅफ कर्जत सिटीने कर्जत शहरात तयार केलेल्या आॅक्सिजन पार्क (घन वन) च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धन या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल थेरगाव ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला, या यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव, गटविकास अधिकारी श्री अमोल जाधव, नगराध्यक्षा सौ उषा राऊत, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे फाउंडर चेअर संदीप काळदाते, रोटरीचे प्रेसिडेंट संदीप गदादे, सेक्रेटरी सचिन धांडे, रोटरी ऑक्सिजन पार्क या प्रोजेक्टचे चेअरमन रो.प्रा.विशाल मेहेत्रे, सरपंच मिनिनाथ शिंदे, उपसरपंच किरण शिंदे, माजी सरपंच रविंद्र महारनवर, ग्रामपंचायत सदस्य अशोक सकट आदी उपस्थित होते.





