कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- राहता तालुक्यातील भगवतीमाता विद्या मंदिर भगवतीपुर ता. राहाता, जि. अहिल्यानगर या विद्यालयाचा सप्टेंबर- 2024 मध्ये झालेल्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा-2024 इंटरमिजिएट व एलेमेंटरी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल शेकडा 100% लागला आहे.
इंटरमिजिएटया निकालामध्ये A ग्रेडमध्ये एक B ग्रेड मध्ये एक तर C ग्रेड मध्ये 9विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
कु. शेख सिमरन मुनावर -A
कु.पवार चैताली मोहन -B
इलेमेंटरी या निकालामध्ये B ग्रेड मध्ये 8 तर C ग्रेड मध्ये 19 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना एस.एस.सी परीक्षेमध्ये वाढीव सवलतीचे गुण मिळणार आहेत. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री. किशोर आहेर सर, प्राचार्या श्रीमती. आडेप.डी.व्ही. यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री, जलसंपदा महाराष्ट्र राज्य) अहिल्यानगर जि.प.च्या मा.अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, अहिल्यानगरचे माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील,संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिताताई विखे पाटील ,शिक्षण संचालिका, सौ.लीलावती सरोदे स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री संभाजीराजे देवकर पाटील, भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सयाजी रघुनाथ खर्डे पाटील, प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. भास्कर खर्डे पाटील,सरपंच, उपसरपंच, सदस्य श्री.गोरे सर, श्री,भालेराव सर, सौ.बलसाने मॅडम, श्री. कडसकर सर, श्री.कदम सर, सौ.पारखे मॅडम, सौ. सोनवणे मॅडम, सौ.कडनोर मॅडम,सौ. म्हस्के मॅडम, सौ.मोरे मॅडम, श्री.वसंत शेळके सर श्री.कडू सर,श्री.शेजुळ सर, श्री.श्रावण वडीतके, श्री.राजेंद्र आहेर,श्री.बोरसे,सर्व पालक,ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.