22.7 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

जलजीवनच्या कामांचे थर्ड पार्टी ऑडीट करा- खा. नीलेश लंके यांची मागणी  जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची दिल्लीत भेट 

नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणी योजनांच्या कामांचे केंद्र सरकारच्या समितीकडे थर्ड पार्टी ऑडीट करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची शुक्रवारी नवी दिल्लीत भेट घेऊन मागणी केली. तसे पत्रही खा. लंके यांनी मंत्री पाटील यांना सुपूर्द केले. 

मंत्री पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, जनजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुर ७९ योजनांपैकी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दहा योजना पुर्ण झाल्या आहेत. या कामांमध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. तशा तक्रारीही आपणाकडे प्राप्त झाल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज, आनंदनगर व अन्य आठ योजनांचे केंद्रीय समिती मार्फत ऑडीट केल्यास या कामांमधील भ्रष्टाचार उघड होणार आहे. मंत्री पाटील यांनी लवकरात लवकर या योजनांचे ऑडीट करावे अशी मागणी खा. लंके यांनी निवेदनात केली आहे.

जिल्हा परिषदेचा प्रतिसाद नाही 

यासंदर्भात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांच्या कामांचे केंद्रीय समिती मार्फत ऑडीट करण्यासंदर्भात आपण जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे दोन ते तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

खा. नीलेश लंके (लोकसभा सदस्य) 

चला, मी भ्रष्टाचार दाखवितो ! 

डिसेंबर महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीच्या बैठकीतही खा. लंके यांनी या योजनेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. माझ्यासोबत चला मी भ्रष्टाचार दाखवितो. भ्रष्टाचार नसेल तर मी राजीनामा देतो असे आव्हान खा. लंके यांनी दिले होते. 

निकृष्ट पाईप 

या योजनेसाठी निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले आहेत. दर्जाहिन पाईप जमीनीमध्ये एक फुटावर गाडण्यात आले आहेत. कोटयावधींचा निधी मंजुर होऊन पाच टक्के योजनांची कामेही दर्जेदार झालेली नाहीत. बिले काढण्यासाठी व टक्केवारीसाठी कामे करण्यात येणार असतील तर योजना यशस्वी होणार नसल्याचेही दिशा समितीच्या बैठकीत लंके यांनी निदर्शनास आणून दिले होते. 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!