18.1 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

नऊ वर्षाच्या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू .

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा): – पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील इयत्ता तिसरी शिकणारी नऊ वर्षाची ईश्वरी पांडुरंग रोहोकले हीच्या वर काल गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे .

खडकवाडी येथील इयत्ता ३ री शिकणारी ईश्वरी पांडुरंग रोहोकले ही काल गुरुवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरच्यांना सांगून घराबाहेर लघवीसाठी गेली असता शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ईश्वरी वर हल्ला केला , त्यावेळेस तिचे वडील पांडुरंग रोहोकले घराच्या बाहेरील ओट्यावर जेवण करत होते , ईश्वरीचा अचानक आलेल्या आवाजाने त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता धाव घेतली . पण बिबट्याने ईश्वरी ला जवळील शेतात ओढत नेले , त्यावेळेस त्यांनी बॅटरीच्या उजेडयात पाहिले असता , त्यांनी त्यावेळी बिबट्याशी झुंज देत तिची सुटका केली , पण बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .

संबंधीत बिबट्या खडकवाडी परिसरात दुपारी ३ च्या दरम्यान रेस्कू ऑपरेशन द्वारे पकडण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला , तरी ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन पारनेर वनविभागाने केले आहे .

पारनेर तालुक्यात सध्या सर्वत्र बिबट्याने धुमाकुळ घातला असून निघोज , जवळा बागायत पट्ट्यात पाणी , ऊस शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे ही बिबट्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे . वनविभागा ला त्याचा बंदोबस्त करणे शक्य होत नाही . आता तर पठार भागावर ही बिबट्याने उच्छाद मांडला आहे . बिबट्याच्या रुपाने पारनेर तालुक्यात आभाळच फाटले आहे , ठिगळं कुठे कुठे लावणार . वनविभागाकडे पिंपरे ही अल्प प्रमाणावर असल्याने बिबट्याचा बंदोबस्त कसा करणार , हा मोठा प्रश्न आहे . 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!