18.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

इन्फनाईट पतसंस्थेने वादळात दिवा लावण्या चे काम केले – खा . निलेश लंके .

पारनेर( जनता आवाज वृत्तसेवा ): – सहकारी पतसंस्थांची सध्या आपण परिस्थिती पाहतो , पण चेअरमन नवनाथ औताडे यांच्या नेतृत्वाखालील सहकारी पतसंस्था क्षेत्रातील इन्फनाईट पतसंस्थेने मात्र ‘ वादळात दिवा लावण्याचे ‘ धाडसी काम केले असून त्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे , तेवढे कमीच असल्याचे गौरवोद्गार खा . निलेश लंके यांनी काढले .

सुपा येथील सुपा हाईट्स इमारतीमध्ये इन्फनाइट मल्टिस्टेट संस्थेच्या शाखेचा शुभारंभ खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते व पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले यांच्या अध्यक्षते खाली व संस्थेचे अध्यक्ष नवनाथ औताडे, विनोद गाडीलकर, विक्रम गाडीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला .यावेळी चेअरमन औताडे म्हणाले की , गेल्या सहा वर्षापूर्वी इन्फनाइट मल्टिस्टेट पतसंस्थेचे एक रोपटे लावले होते. त्याचे आत्ता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. जिल्ह्यात श्रीगोंदा येथे ही शाखा सुरू केली असून सुपा येथेही दुसरी शाखा सुरू करत आहे , ज्याठिकाणी आम्ही पाय रोवला , त्या ठिकाणी ताठ उभे राहून एक आदर्शवत काम सर्व सहकार्यांच्या माध्यमातून करणार आहोत. भविष्यात १५ ते २० वर्षांनंतर सर्वजण या संस्थेचा आदर्श घेतील , असा विश्वास ही चेअरमन यांनी व्यक्त केला .

तर खा . लंके पुढे म्हणाले की , चेअरमन नवनाथ औताडे यांनी जे रोपटे लावले , त्या रोपट्याला फुलवायचे काम विनोद गाडिलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. गोरगरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो, याची जाण ज्याच्याकडे असते, तो कधीच मागे रहात नाही, आज सहकारी पतसंस्थांची आपण अवस्था पाहतो , पण या ‘ वादळात दिवा लावण्या चे ‘ काम चेअरमन औताडे , गाडीलकर व सहकाऱ्यांच्या माध्यमातून करत आहे , हे सोपे नाही सकाळी उठल्यावर दिनक्रम पाहिला , आज कोणताही कार्यक्रम नाही , परंतु येथे आल्यावर समजले की , गाडिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या शाखेचा शुभारंभाचा कार्यक्रम आहे. कारण गाडीलकर यांचे समजाभिमुख मोठे कार्य असून त्यांचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे , असे ही शेवटी खा. लंके यांनी गौरवोद्गार काढले .

यावेळी पोलीस उपअधिक्षक संपतराव भोसले म्हणाले की, सर्व सामान्य, गोरगरीब, कष्टकरी नागरिकांचा पैसा आहे, त्याला काळजीपुर्वक जपले पाहिजे , कारण त्या पैशावरच सामान्यांचे आयुष्य अवलंबून असते. एवढे बोलून भोसले यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.

यावेळी मेजर बबनराव गाडीलकर , वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ, सरपंच दादा दरेकर , संचालक प्रसाद देशमुख , विनायक मराठे, मनसुख गुगळे , सुवर्णा औताडे, शुभम औताडे , इतर मान्यवर , सभासद , पुणे , दौंड , श्रीगोंदा , पारनेर येथील खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुत्रसंचालन अंकुश सापते , योगेश रायकर यांनी केले , तर आभार विनोद गाडीलकर यांनी मानले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!