सात्रळ( जनता आवाज वृत्तसेवा ):- उडण्याची उमेद मनामध्ये लागते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी झगडावे लागते. शैक्षणिक जीवनातील संधीचा फायदा घेऊन यशाचे शिखर गाठता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी सर्वांगीण प्रगती करण्याचे काम यापुढे करावयाचे आहे. नियमितता, सातत्यता आणि कार्यमग्नता ठेवल्यास जीवनात नक्कीच यश मिळते. विद्यार्थ्यांनी यशोगाथा घडल्यावरही माता आणि मातीचा आदरभाव ठेवला पाहिजे असे सुहास वैद्य असे म्हणाले.
प्रवरेच्या नदी काठावरील धानोरे घाटावर आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. ‘युथ फॉर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटरसी’ हे मध्यवर्ती आशयसूत्र घेऊन सदरचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केल्याची माहिती स्वागत व प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. एस. एन. शिंगोटे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब कारभारी दिघे पाटील हे होते.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक श्री. किरण सुधाकर दिघे, श्री. सुभाष नामदेव अंत्रे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री. रमेश भिमराज पन्हाळे, प्रा. बाळासाहेब सर्जेराव दिघे, जयवंत जोर्वेकर, किसन दिघे, धानोरे गावचे उपसरपंच ज्ञानदेव दिघे, पांडुरंग दिघे, रंगनाथ दिघे, राहुल दिघे, राहुल दिघे, नंदू दिघे, अंबादास दिघे, सुभाष दिघे, यशवंत दिघे, ऋषिकेश दिघे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भडकवाड, डॉ. निलेश कान्हे, डॉ. विजय शिंदे, प्रा. संदिप राजभोज, प्रा. एस. पी. कडू, प्रा. सुधीर वाघे, स्वयंसेवक प्रतिनिधी कु. ईश्वरी बडोदे, कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते.
तरुणाईला मार्गदर्शन करताना श्री. सुहास वैद्य पुढे म्हणाले, युवकांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी होऊन व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. देशाविषयीची रचनात्मक कार्यमग्नता महत्त्वाची आहे. शैक्षणिक वाटचालीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ‘हम भी कुछ देना सीखे’ ही सक्षम भारत घडवणारी कविता सोदाहरण स्पष्ट करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शिबिर काळात ग्रामस्वच्छता, नव-मतदार जनजागृती, वृक्षारोपण, डिजिटल लिटरसी, व्यक्तिमत्व विकास, व्याख्यानमाला, अक्षय ऊर्जा जनजागृती, समाजप्रबोधनपर पथनाट्य, शिवार फेरी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व, ग्रामस्थ भेट, बौद्धिक खेळ, अहवाल लेखन, आरोग्य व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर इत्यादी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
शिबिरात डॉ. भाऊसाहेब नवले यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ तर प्रवरा कमिटी रेडिओच्या सौ. गायत्री म्हस्के यांनी ‘संवाद कौशल्य’ या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले. आभार उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी मानले. कार्यक्रमास स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.