लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलयुक्त अंतर्गत पाणीसाठ्यात वाढ होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. यांचा निश्चित फायदा हा भुजल पातळी वाढविण्यासाठी होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथे कृषि विभाग यांच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत नाला खोलीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, चंद्रपूरचे सरपंच अण्णासाहेब पारधे, उपसरपंच दिपाली तांबे, विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक बन्सी पाटील तांबे, शहाजी घुले, सचिन तांबे दगडू तांबे, नामदेव तांबे,संदिप तांबे,मारुती तांबे, डाॅ.अण्णासाहेब तांबे, कृषी सहाय्यक प्रशांत वाकचौरे, सिद्धार्थ फाटके आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी संवाद साधतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या,राज्य सरकारच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान प्रत्येक गावामध्ये राबवले जाणार आहे. या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.वाहून जाणारे पावसाचे पाणी ओढे,नाले आणि शेतामध्येच मुरवण्यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षाही सौ विखे पाटील यांनी व्यक्त व्यक्त करुन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून अनेक योजना जिल्ह्यात सुरू आहेत या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकासही होत आहे. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात नदी जोड प्रकल्पासह पाणी साठा कशा पद्धतीने वाढवता येईल या वरती एक विशेष काम सुरू आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेत नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी या योजनेची सविस्तर माहिती यावेळी दिली.