लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ) :- नुकत्याच झालेल्या शालेय ड्रॉप रोबॉल १९ वर्ष वयोगट स्पर्धेत गंगागिरी ज्युनिअर कॉलेज वाकडी व लातूर पॅटर्न क्लासेस लोणी येथे शिक्षण घेत असलेल्या सेजल नारायण गंभीरे व तेजल नारायण गंभीरे यांची राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी बाभळेश्वर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथुन जिल्हास्तरीय ड्रॉप रोबॉल स्पर्धेत विभागीय स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली व दि.१७ जानेवारी २०२५ रोजी सोलापूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस येथे झालेल्या सामन्यातून राज्यस्तरीय सामान्यासाठी निवड झाली.
द. २२ ते २४ जानेवारी २०२५ दरम्यान नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या सामन्यातून सेजल व तेजल यांची राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी निवड झाली असून त्यांना प्रशिक्षण अधिकारी नरेंद्र कुसळकर, साबीर शेख, शिक्षक उगले, बेंद्रे, गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
लोणी येथील लातूर पॅटर्न क्लासेसचे संचालक प्रा. विजय भोसले व प्राचार्य राहुल लगे यांनी वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. यावेळी त्यांचा सत्कार केला सत्कार समारंभात बोलताना या मुलींनी जीवनात शिक्षणाबरोबरच खेळाला विशेष महत्त्व द्यावे, असे विद्यार्थ्यांना सांगितले.
या विद्यार्थिनींचा सत्कार करुन सर्व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.