अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही सत्रातील उत्कंठावर्धक लढतींनी कुस्ती शौकीनांची मने जिंकली. माती विभागात महेंद्र गायकवाड, संदीप मोटे, वेताळ शेळके, विशाल बनकर, अनिकेत मांगडे, आकाश रानवडे तर गादी विभागात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे,, पृथ्वीराज मोहोळ, सुदर्शन खोतकर यांची आगेकूच तर महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख, हर्षवर्धन सदगीर यांच्यासह महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ज्ञानेश्वर जमदाडे, हर्षद कोकाटे, शुभम शिंदनाळे, श्रीमंत भोसले, नरेश म्हात्रे, गणेश कुकुते, अभिमन्यू फुले, भरत कराड, रमेश बहिरवाल, वैभव माने, यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना सायंकाळी सुरुवात झाली. या लढती पहाण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल होते. राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस व स्पर्धेचे आयोजक आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत रंगल्या कुस्त्या.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि आमदार संग्रामभैया जगताप सोशल फाउंडेशनच्या वतीने अहिल्या नगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडानगरी, वाडीया पार्क येथे सुरू असलेल्या ६७ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या सकाळ व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील ५७, ८६ , ६१, ७९ , ६५, ७४, ९२ आणि महाराष्ट्र केसरी (८६ ते १२५ ) किलो वजनी गटातील काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले. तर काहींनी धक्कादायक निकालाची नोंद करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना सायंकाळी सुरुवात झाली. या लढती पहाण्यासाठी अहिल्यानगरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल होते.
माती विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या सोलापूरचा उप महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत एकेरी व दुहेरी पटांच्या डावांवर निर्धारित वेळेत ५-० गुणांने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेचा पराभव केला.तर सांगलीच्या संदीप मोटे याने साताऱ्याच्या गणेश कुकुते याचा ६-०, सोलापूरच्या विशाल बनकर व अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे यांच्यात अत्यंत प्रेक्षणीय लढत झाली. पहिल्या फेरीत दोघेही आक्रमक पवित्रा घेत गुणांची कमाई करण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये ज्ञानेश्वरला फारसे यश मिळाले नाही. पहिल्या फेरीत विशाल बनकरने ७-० अशी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. मात्र पिछाडीवर पडलेल्या ज्ञानेश्वरने आक्रमक आणि सावध पवित्रा घेत विशालचे डाव प्रतिडाव हाणून पाडत २ गुणांनी खाते उघडले. पुन्हा एकदा विशालने २ गुण घेत गुणांची संख्या ९ वर नेली. पुन्हा एकदा पिछाडीवर पडलेल्या ज्ञानेश्वरने विशालचे दुहेरीपट काढून ४ गुणांची कमाई करत लढतीत रंगत निर्माण केली, पुन्हा एक गुणांची कमाई केल्याने ९-७ असा गुणफलक झाला. मात्र कुस्तीची निर्धारित वेळ संपल्याने विशालने हि लढत ९-७ अशी जिंकत आगेकूच केली तर ज्ञानेश्वरचे आव्हान संपुष्टात आल्याने त्याचे पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न भंगले. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने कोल्हापूरच्या श्रीमंत भोसले याचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत विजयी घोडदौड राखणाऱ्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरची विजयी घोडदौड पुढच्या फेरीत विशाल बनकरने रोखत त्याचे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे स्वप्न संपुष्टात आणले. या लढतीत पहिल्या फेरीत दोघांनी एकेक गुणांची कमाई करत बरोबरी साधली. पुढच्या फेरीत दोघांनीही आक्रमक पवित्रा घेतला. विशाल बाहेर गेल्याने हर्षवर्धन एक गुण मिळाला आणि गुणांची संख्या २-१ अशी झाली. पिछाडीवर पडलेल्या विशाल पुन्हा एक त्यानंतर हर्षवर्धनचा दुहेरी पट काढून ४ गुणांची कमाई करत लढतीत रंगत निर्माण केली. पुन्हा साल्तो डावावर २ गुण वसूल करून कुस्तीच्या निर्धारित वेळेत विशालने हि लढत ८-२ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला.
महाराष्ट्र केसरी व वाशिमचे प्रतिनिधी करणाऱ्या बाला रफिक शेखने हिंगोलीच्या नितीन खंडेलवालचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत धडक मारली होती. परंतु पुढच्या फेरीत सोलापूरच्या वेताळ शेळके याच्या बरोबर झालेल्या लढतीत बालारफिक शेखच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला तर वेताळ शेळके याचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला.
गादी विभागात महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या पुण्याचा नवोदित मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने जालन्याच्या जगदीश चारावडेचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तर नांदेडचे प्रतिनिधित्व करणारा पण मूळचा पुण्याचा असणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणारा हर्षद कोकाटे यांच्यात लढत झाली. हि लढत अत्यंत चुरशीची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र धिप्पाड शरीरयष्टी व बलदंड शिवराज राक्षे याने सुरुवातीलाच आक्रमकता धारण करत डाक लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला असला तरी त्यात हर्षदवर ताबा घेत २ गुणांनी खाते उघडले पुन्हा एकदा पट काढण्याच्या प्रयत्नात हर्षद बाहेर गेल्याने शिवराजचा एक गुण मिळाला. यावेळी हर्षदच्या हाताला दुखापत झाल्याने कुस्ती काही मिनिटे थांबली होती. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ होताच पिछाडीवर पडलेल्या हर्षदने शिवराजचा एकेरी पट काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याचा फायदा घेत शिवराजने ताबा घेत २ गुणांची कमाई केली. त्याच स्थितीत शिवराजने सलग दोन भारंदाज डावावर ४ गुणांची कमाई करत ही लढत ११-० अशी जिंकत विजयी अश्वमेध सुरू ठेवला.
माती विभागातील ६१ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या स्वरूप जाधवने अहिल्यानगरच्या विश्वजीत सुरवसे याचा ११-०, तर कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वल याने अत्यंत चुरशीच्या लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडे याचा ३-२ अशा गुणाधिक्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम लढतीत कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वलेने अटीतटीच्या उत्कंठावर्धक लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वरूप जाधवचा ३-२ गुण फरकाने निसटसा पराभव करून सुवर्णपदक पटकावले तर स्वरूपला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्यपदकाच्या लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडे याने अहिल्या नगरच्या विश्वजीत सुरवसे याचा १०-० अशा गुणाधिक्यांनी पराभव करून कांस्यपदक पटकावले.
माती विभागातील ७९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत अहिल्यानगरच्या ऋषिकेश शेळके याने जालन्याच्या प्रमोद काळेचा १२-१, तर साताऱ्याच्या संदेश शिपकुले याने धक्कादायक निकालाची नोंद करत सांगलीच्या नाथा पवारचा ११-०
.



