9.9 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

ईडी प्रकरणात हसन मुश्रीफ यांना तूर्तास दिलासा

मुंबई | Mumbai:-राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
दरम्यान हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाने या अर्जावर तातडीने सुनावणी पूर्ण करावी, असे निर्देशन हायकोर्टाने दिले आहेत. गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.
आमदार मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीतील व्यवहारावरून ‘ईडी’ च्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे. शनिवारी सकाळी दहा गाड्यांतून सुमारे २४ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले होते. त्यापैकी बारा जणांनी मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा टाकला. दुपारी साडेबारापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्यातील सहा जण तेथून निघून गेले.
शनिवारी सकाळी त्यांच्या कागल मधील निवासस्थानी ईडीच्या पथकाने तिसऱ्यांदा छापा टाकला. तेव्हापासून आमदार मुश्रीफ हे नॉट रिचेबल होते. सोमवारी त्यांना ईडीने मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यानंतर हसन मुश्रीफ यांना अटक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, त्यांना तुर्तास दोन आठवडे अटकेपासून दिला मिळाला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!