शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा):-विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्व समावेशक आणि विकसित भारताच्या पायाभूत सुविधांना बळकटी देणारा आहे.शेतकरी महीला युवक आणि भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
अर्थसंकल्पावर बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका विकासाच्या मंत्राचा अंतर्भाव आजच्या अर्थसंकल्पात असून, आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने निर्मला सितारामन् यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वच घटकांच्या विकासाला संधी देणारा आहे.
देशाच्या अर्थिक विकासात कृषी क्षेत्राचा वाटा महत्वपूर्ण राहाणार असल्याने यावर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन मोठे आहे.देशातील शंभर जिल्ह्यात कृषि जिल्हा विकास योजनेबरोबरच पंतप्रधान अन्न धान्य योजना कमी उत्पादन असलेल्या जिल्ह्याच्या कृषी विकासाला बळकटी देईल.डाळ तेलबिया कापूस उत्पादनाला प्रोत्साहन देतानाच कृषि क्षेत्रातून रोजगार निर्मितीवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.किसान क्रेडीट कार्ड वरील कर्ज मर्यादा वाढविल्याने शेतकर्यांना मोठा आधार मिळेल असे विखे पाटील यांनी सांगितले.
युवकांसाठी लघुउद्योगाला प्रोत्साहन देण्याच्या अर्थमंत्र्याच्या घोषणेचे स्वागत करून, ५कोटी लघुउद्योगांच्या निर्मतीतून सात कोटी रोजगाराचे उद्दीष्ट्य ठेवले आहे.स्टार्ट अप योजनेची कर्ज मर्यादा २०कोटी पर्यत वाढविण्यात आली आल्याने देशातील स्टार्ट अप योजनेला अधिक गती मिळेल.मागास भागातील महीलांच्या उत्कर्षाकरीता ५लाख महीलांना दोन कोटी रुपयांच्या कर्ज योजनेतून कौशल्य विकासा बरोबरच महीलांच्या अर्थिक सक्षमीकरणासाठी टाकलेले पाऊल आहे.
कर्करोगाच्या सर्व औषधांवरील तसेच महत्वपूर्ण आशी ३६ औषध कस्टम ड्युटी हटवल्याच्या निर्णयाचा मोठा दिलासा सर्वसामान्य माणसाला मिळणार असून,१२लाखा पर्यतचे उत्पन्न आयकर मुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेवून केंद्र सरकारने सामान्य कर दात्यांची मोठी अपेक्षा पुर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांचे मंत्री विखे पाटील यांनी अभिनंदन करून आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करताना आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प दिशादर्शक ठरणारा आहेच,परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे देशातील सर्वसामान्य माणूस शेतकरी युवक महीला यांच्या बरोबरच भारतीय उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित झालेला अर्थसंकल्प असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.