spot_img
spot_img

नाथ षष्ठी निमित्ताने खा. विखे यांनी घेतले संत एकनाथ समाधीचे दर्शन वारकऱ्यांशी संवाद साधून केंद्रीय राज्यमंत्र्या सोबत फुगडी खेळली

पैठण (प्रतिनिधी) :-दक्षिण नगरचे खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी नाथ षष्ठीच्या निमित्ताने पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले,यावेळी नाथ षष्ठीच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील आलेल्या अनेक भागातील दिंडीनी भेट देत वारकऱ्यांशी संवाद साधला, त्यांची विचारपूस करत त्यांच्या समावेत हरिनामात दंग झाले. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या बरोबर फुगडी देखील खेळली. 

दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या फुगडी खेळल्याने वारकरी महिला पुरूषात एक नवचैतन्य निर्माण होऊन वातावरण भक्तीमय झाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!