श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश गोविंदराव आदिक यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आदिक यांना नियुक्ती पत्र दिले, पार्थ पवार त्यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अविनाश आदिक यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यांना आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य कारभाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
वरील राज्यांव्यतिरिक्त श्री. आदिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सारख्या आघाडीच्या संघटनांचीही जबाबदारी पाहतील असे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रभारी प्रशासन एस.आर.कोहली यांनी कळविले आहे.
अविनाश आदिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ता होते . आदिक यांच्या वेगवेगळ्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. सध्या ते महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष, अशोक एज्युकेशन सोसायटीचे सचिव, रामराव पब्लिक स्कुलचे अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. तर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचे ते बंधू आहेत.