श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरातील जुनी बाजारपेठ व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे दोन दिवसापासून काढण्यात येत आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने अतिक्रमणधारकाची अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक पार पडली.
शासनाने ४० फूट की ५० फूट असे रस्त्याचे निर्देश न ठरविता अतिक्रमण काढण्यात आली. मुख्य रस्त्यासह उपनगरातील इतर डीपी रस्त्याचे अतिक्रमणे देखील काढण्यात येणार असल्याचे समजते.
यामुळे छोटे-मोठे, गोरगरीब व्यापारी वर्गाची दुकानदारी उध्वस्त झालेली आहे. व्यावसायिक वर्ग पूर्ण उघड्यावर पडली आहे. छोटी दुकाने नष्ट झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेऊन योग्य तो तोडगा काढावा तसेच नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करून पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी यांचेकडे केली.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे गौतम उपाध्ये, पुरुषोत्तम झंवर, प्रविण गुलाटी, निलेश नागले, रियाज पठाण, इम्रान पोपटीया, देवा अग्रवाल, निलेश बोरावके, अनिल लुल्ला, अमोल कोलते, विराज आंबेकर, संजय कासलीवाल, बी.एम.पवार, दत्तात्रय ढालपे, आदींसह अशोक कारखान्याचे संचालक निरज मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, प्रविण फरगडे, गणेश छल्लारे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अतिक्रमण पिडीत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.