5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

महायुती सरकारने ३ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या तालुक्यांना अप्पर तहसील कार्यालय निर्मीतीचा संकल्प केला- डॉ सुजय विखे पाटील आश्वी बु येथील अप्पर तहसील कार्यालय राजकिय हेतूने नसुन लोकांच्या सोईसाठी

आश्वी (जनता आवाज वृत्तसेवा ):-महायुती सरकारने ३ लाखापेक्षा जास्त लोक संख्या असणाऱ्या तालुक्यांना अप्पर तहसील कार्यालय निर्मीतीचा संकल्प केला आहे.यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील ३ व उत्तर महाराष्ट्रमधील नासिक डिवीजनमधील विभागीय कार्यालयामध्ये १४ असे एकदरीत रचना असल्याचे  डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथे स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालयाची निर्मीतीसाठी अध्यादेश केला असुन तालुक्यातील महसुल विभागावर अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी शासनाने संगमनेर तालुक्यातील एकुण ६२ गावे महसुल विभागासाठी नव्याने होऊ घातलेल्या आश्वी बु येथील अप्पर तहसिल कार्यलाय अंतर्गत टाकली आहे .यामध्ये संगमनेर खुर्द महसुल विभागा अंतर्गत येणाऱ्या संगमनेर खुर्द, खांडगाव, वेदुवाडी, चंदनापुरी गाभणवाडी, झोळे, रायतेवाडी, देवगाव, निमगांव टेंभी, शिरापुर, निमज, सावरगावतळ, पिपळगांव माथा, हिवरगाव पावसा तर समानापुर महसुल अंतर्गत येणाऱ्या समानापुर, कोकणगाव, कोंची मांची शिवापूर पोखरी हावेली, कुरण,वडगांवपान, माळेगांव हवेली ,सुकेवाडी,खांजापुर, पिंपरणे महसुल विभागा अंतर्गत येणाऱ्या पिंपरणे, जाखुरी,अंभोरे,कोळवाडे, ओझरबुद्रुक,कनोली,कनकापुर,कोल्हेवाडी,जोर्वे ,निबांळे,वाघापुर,खराडी,रायते गावे येतात.

शिबलापुर महसुल विभागाअंतर्गत येणाऱ्या शिबलापुर,पानोडी,आश्वी खुर्द,खळी,पिंप्रीलौकी अजमपुर, चणेगाव, झरेकाठी,दाढ खुर्द,मांलुजे,डिग्रस,शेडगाव,हंगेवाडी आश्वी बुद्रुक महसुल विभागा अंतर्गत येणाऱ्या आश्वी बुद्रुक,प्रतापपुर,उंबरीबाळापुर,औरंगपुर,सादतपुर चिंचपूर बुद्रुक,चिंचपूर खुर्द,निमगांवजाळी, रहिमपुर, ओझर खुर्द,मनोली, आदी गावाचा समावेश होतो.

प्रशासनाने घाईगडबडीत हे प्रस्ताव पाठवले असून हा प्रस्ताव विचारधिन आहे कुठले ही अंतीम चित्र स्पष्ठ झाले नाही.अप्पर तहसील कार्यालयाची निर्म४ती ही लोकांच्या सोईसाठी केली जाते.यामध्ये जर संगमनेर तालुक्यातील जनतेच्या मनात काही संधिकता असेल तर जर लोकांची मागणी असेल की आमचे गावे हे प्रस्तावित अप्पर तहसिल कार्यक्षेत्रात जोडु नये तर अशा गावांना वगळण्यात येईल जनतेच्या मनाविरुद्ध जाऊन कुठले ही प्रकिया केली जाऊ शकत नाही.

माजी महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळामध्ये अहिल्यानगर तसेच सिन्नर येथे ही अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाली आहे.ही शासकीय प्रकिया आहे.यामध्ये कुठले ही राजकारण नाही पण दुर्दैवमुळे मुद्दे संपल्यामुळे तसेच लोकांची खोटी सहानभुती मिळवण्यासाठी संगमनरेचे माजी आमदार जनतेला विराधाभास दाखवण्याचा प्रयत्न करतात. जनतेने दिलेला कैल हा सर्व प्रिय असतो.जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणते ही कारवाई केली जाणार नसल्याचे ही डॉ सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!