संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते.मतांच्या माध्यामतून जनतेन या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने खऱ्या अर्थाने परिवर्तन करून दाखविले आहे कोणाच्या तरी सांगण्यावरुन पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी मनसे प्रमुख राजसाहेब तुम्ही मुंबईच्या बाहेर या, संगमनेर पाहा .मी तुम्हाला संगमनेरला आमंत्रित करतोय, असा खोचक टोला महायुतीचे आ. अमोल खताळ यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते “बाळासाहेब थोरात हे नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. 70 ते 80 हजार मताधिक्याने जिंकणारे थोरात यंदा अवघ्या 10 हजार मतांनी पराभूत झाले, हे शक्य आहे का?पुढे त्यांनी हीनिवडणूक लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे प्रखर मत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त करत. लोकांनी दिलेली मते कुठेतरी गायब झाल्याचा संशय व्यक्त करून या निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
याबाबत आ. अमोल खताळ यांनी आपल्या ट्विटर वरून म्हणाले की संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोज गारी, अपूर्ण विकास व जनतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ४० वर्षांपासून निवडून दिले ल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारलं आहे. ४० वर्षे आमदार, १७वर्षे मंत्री असून पण तालुक्यात साधी एमआयडीसी सुद्धा होऊ शकली नाही . शेतीला पाणी नाही. मग जनतेने मत का द्यावी?” असा प्रश्न खताळ यांनी विचारला आहे.