संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्राचीन मंदिरे व गडकिल्ल्यांचा विकास करून पर्यटन क्षेत्राला वाव द्यावा अशी मागणी आ अमोल खताळ यांनी मुंबई येथे राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली केली. याबाबत राज्य सरकार प्राचीन मंदिरे व गडकिल्ल्यांचा विकास करण्यासाठी लवकरच आवश्यक ती पावले उचलेले जातील असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात अनेक प्राचीनकालीन मंदिरे आणि गड-किल्ले आहेत. परंतु या मंदिराचा आणि गड किल्ल्यांचा फारसा विकास, झालेला नाही त्यामुळे पर्यटन क्षेत्राला वाव मिळत नाही.त्यासाठी पर्यटन मंत्रालयाच्यामार्फत या तालुक्यातील मंदिरे आणि गडकिल्ले विकसित केले त मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्राला वाव मिळेल आणि पर्यटक या प्राचीन मंदिराकडे आणि गडकिल्ल्यांकड आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी राज्य शासनाने या तालुक्यातील प्राचीन मंदिरे व गड किल्ले पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले तर यातालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलबध्द होऊन रोजगार मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि पर्यटनाच्या दृष्टीने प्रचार आणि प्रसार करण्याचे काम पर्यटन मंत्रालयाने करावे
असे आ अमोल खताळ यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना पटवून दिले आ खताळ यांच्या पत्राची पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी गांभीर्याने दाखल घेत संगमनेर विधानसभा मतदार संघा रामधील सर्व प्राचीन मंदिरांचा आणि गड -किल्ल्यांचा विकास करण्यासाठी शासन लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलेल असा विश्वास पर्यटनमंत्री शंभू राज देसाई यांनी व्यक्त केला .