20.6 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

संगमनेर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ९१७६ घरकुले मंजूर आमदार अमोल खताळ यांची माहिती

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्प नेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,अजित पवार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्रीआवास योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील१४२ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ९हजार१७६ घर कुलांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. 

प्रधानमंत्री आवास योजना’ ही गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. २०२५ पर्यंत सर्वांना घर’ हे उद्दिष्ट साध्य करण्या साठी ग्रामपंचायत स्तरावर मॉनिटरिंग समित्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी BPL सर्वेक्षण आणि सामाजिक-आर्थिक जनगणना डेटा यावर आधारित लाभार्थी निवड केली जात आहे.योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याचा ग्रामविकास विभाग आणि पंचायत समिती स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाचे विशेष सहकार्य लाभले असून, संपूर्ण संगमनेर तालुक्यातील पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.

पंतप्रधान घरकुल आवास योजनेंतर्गत समाजातील सर्वात गरीब आणि वंचित घटकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र शासन ६०% आणि राज्य शासन ४०% असा आर्थिक सहभाग देत आहे. यात SC/ST घटकां साठी २हजार ,५६४, अल्पसंख्याकांसाठी ९९२ व इतर घटकांसाठी ६ हजार,६२० घरकुलांचे वाटप करण्यात आले असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!