28.6 C
New York
Saturday, July 12, 2025

Buy now

spot_img
spot_img

विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या विचाराचे अनावरण करावे – सदाफळ

राहाता (प्रतिनिधी) :-शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध स्पर्धा यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अत्यंत गरज आहे, त्यामुळे त्या विचाराचे अनावरण करावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते राहुल सदाफळ यांनी केले .

 

          केलवड गावातील श्री साईबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रमेश वाघे व सचिव बिकिराज जोर्वेकर यांच्या पुढाकारातून श्री ज्ञानेश्वर विद्यालय व प्राथमिक शाळेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते . भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलवड येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धांचे मोठे आयोजन यावेळी करण्यात आले होते, यावेळी संस्थेकडून ज्ञानेश्र्वर विद्यालयार लागणाऱ्या इन्व्हर्टरसाठी काही रक्कम देण्यात आली . 
    यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी डी गमे, श्री साईबाबा संस्थेचे अध्यक्ष रमेश वाघे, टिक टॉक स्टार शंतनू शिंदे, सचिव विकिराज जोर्वेकर, दत्तू जटाड, रामदास वाघे, सौरभ भागरेचा, शुभम गमे, किरण गुंजाळ, ऋषी कांदळकर, मेजर विजय गाडेकर, अप्पासाहेब सोनवणे, दीपक गायकवाड, छत्रपती युवा संस्थेचे महेश रेवगडे, मुख्याध्यापक महेंद्र जेजुरकर यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते . कार्यक्रमासाठी आकाश मींडा, सुनील धुतीया, संदीप शेट्टी, सतीशकुमार चोंडे, सुधीर आचार्य, विकी नेदर यांच्या आर्थिक निधीतून जयंतीसाठी सहकार्य लाभले .
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!