6.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

नेवासा तालुक्यात पाच हजार घरकुले प्रधानमंञी आवास योजनेंतर्गत मंजूर…. आ. विठ्ठलराव लंघे – पाटील यांची माहीती!

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ): – प्रधानमंत्री आवास योजने – अंतर्गत नेवासा तालुक्यातील ५ हजार २५८ नविन घरकुलांचे उदिष्ठ असतांना तालुक्यातील ५ हजार दोन नविन घरकुलांना मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

यावेळी बोलतांना आमदार लंघे – पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासनाचा एक स्तुत्य उपक्रम आहे यामध्ये केंद्र शासनाकडून ६० टक्के व राज्य शासनाकडून ४० टक्के निधी घरकुलासाठी देण्यात येतो पंचायत समितीमार्फत हे प्रस्ताव पाठविण्यात येत असून समाजातील गोरगरीब व गरजवंत आणि भूमिहीन घटकांना स्वतःचे हक्काचे पक्के घर उपलब्ध करून निवारा देणे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्यामुळे तालुक्यातील गरीब व गरजू लाभार्थी घरकुलांपासून वंचित राहणार नसून या योजनेतील सर्व पाञ गोरगरीब घरकुलधारक लाभार्थ्यांची पंचायत समितीस्थरावर कोणतीही अडवणूक न होता लाभार्थ्यांना वेळेत घरकुलाचा निधी त्यांच्या खात्यावर अदा करण्याच्या सुचनाही आपण संबंधित विभागांना दिल्या असल्याची माहीती यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नेवासा तालुक्यात सन – २०२४-२०२५ या दुसऱ्या टप्प्यातील ५२५८ घरकुलांचे उदिष्ट असतांना आपण ५००२ नविन घरकुलांना मंजूरी देवून ९१० घरकुल लाभार्थ्यांना पहील्या टप्प्याचे अनुदान वर्ग करण्यात आलेले असून नेवासा तालुक्यातील गरजू व गरजवंत कोणताही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नसल्याची माहीती यावेळी बोलतांना आमदार लंघे – पाटील यांनी दिली.

गोरगरीब घरकुलधारक लाभार्थ्यांची शासनस्थरावर कोणीही अडवणूक करणार नाहीत अशा सक्त सुचना आपण संबंधितांना दिलेल्या असून प्रधानमंञी आवास योजनेच्या पाञ लाभार्थ्यांना जास्तीत जास्त निवारा देण्यात येईल कोणाला जागेची अडचण आली तर शासनास्तरांवर लाभार्थ्यांना जागा मिळण्यासाठी निधीची तरतुद करण्यात आलेली असून घरकुल लाभार्थ्यांना सहकार्य करण्याची भूमिका संबंधितांनी बजवावी असे आवाहनही आमदार लंघे – पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!