spot_img
spot_img

कोल्हार भगवतीपूरमध्ये शिवप्रतिमा पूजन

कोल्हार ( वार्ताहर ) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने कोल्हार भगवतीपूर येथे आनंद ऋषी चौकामध्ये शिवप्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड. सुरेंद्र खर्डे, भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाश खर्डे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे, विखे कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर खर्डे, डी. के. खर्डे,  धनंजय खर्डे, केतन लोळगे, शिवाजी उदावंत, वसंतराव मोरे, अनिल हिरानंदानी, वसंत खर्डे, श्याम गोसावी, पक्षाचे शहर प्रमुख विजय गोहर, युवा सेनाप्रमुख धनंजय घोरपडे, तालुका संघटक संतोष जोर्वेकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख युवराज बांगरे, राजेंद्र कापसे, वसंतराव लबडे, संतोष लोखंडे, पप्पू अत्तार, संतोष राजभोज, श्याम लोखंडे आदी उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!