3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

सोशल मिडियाचे दुष्परिणाम महिलांसाठी घातक – न्यायमूर्ती आदिती नागोरी कोल्हार महाविद्यालयात महिला दिन उत्साहात संपन्न

कोल्हार (वार्ताहार ) :-  अत्याधुनिक स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या विस्तारामुळे गेल्या काही वर्षात सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सोशल मिडियाने मानवी जीवनात मोठी क्रांती आणली असली तरी त्याचे काही दुष्परिणामही आहेत. हे दुष्परिणाम महिलांसाठी अत्यंत घातक असल्याचे मत राहाता वरिष्ठ स्थर दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश आदिती नागोरी यांनी मांडले.
 कोल्हार महाविद्यालयात तालुका विधी सेवा कोपरगाव अंतर्गत राहाता न्यायालय, जनसेवा फाउंडेशन लोणी आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली महिला दिनानिमित्त ‘महिला मेळावा’  साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून न्यायमूर्ती आदिती नागोरी बोलत होत्या. या महिला मेळाव्यासाठी श्रीमती ए. ए. कुलकर्णी (सहदिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्थर, राहाता), एस. एस. मुलाणी (सहदिवाणी न्यायाधिश, कनिष्ठ स्थर, राहाता), शिर्डीच्या सपोनि श्रीमती वाय. एस. कोकाटे, राहाता वकील संघाच्या श्रीमती ज्योती आर. सिसोदिया, श्रीमती एस. व्ही. कामटे, श्रीमती एस. एस. म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते. 
        न्यायमूर्ती आदिती नागोरी म्हणाल्या की, ‘सोशल मीडियाचा अति वापरामुळे चिंता, नैराश्य, झोपेचे विकार, भ्रम, आत्महत्येचे विचार आणि स्वत:ला हानी पोहोचविणे आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. म्हणून महिलांनी व तरुण मुलींनी सोशल मिडियाच्या अति वापरापासून दूर राहिले पाहिजे” असे आवाहानही त्यांनी केले. 
याप्रसंगी श्रीमती ए. ए. कुलकर्णी, श्री. एस. एस. मुलाणी, श्रीमती वाय. एस. कोकाटे, श्रीमती ज्योती आर. सिसोदिया, श्रीमती एस. व्ही. कामटे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ आहेर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले
        या महिला मेळाव्याचे नियोजन डॉ. हरिभाऊ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संगीता धीमते, डॉ.प्रतिभा कानवडे व कमिटीने केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. प्रतिभा कानवडे यांनी केले. आभार डॉ. अर्चना विखे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.नीलिमा खर्डे व कुमारी सानिका देवकर यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!