श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे कैवारी होते.सर्वधर्मसमभाव जोपासून त्यांनी राज्यातील जनतेची सेवा केली आणि आपल्या आदर्श कारभाराने स्वतःचे स्थान निर्माण केले.
गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या मनात असलेली तळमळ आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही अनुकरणीय होती.त्यांची कार्यशैली धडाडीची होती.आज अंतुले साहेबांसारख्या कुशल प्रशासकाची गरज आहे असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष राजू सोनवणे यांनी केले.
येथील मानवता संदेश फाउंडेशन व फातिमा वेल विशर्स ग्रुप तर्फे राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी श्री.सोनवणे बोलत होते.
प्रास्ताविक भाषणात मानवता संदेश फाउंडेशनचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी बॅरिस्टर अंतुले यांचा जीवनपट विशद केला.सर्वसामान्य जनतेच्या सेवेचा ध्यास घेतलेला नेता म्हणजे अंतुले साहेब असे ते म्हणाले.
याप्रसंगी अंतुले यांच्या प्रतिमेस राजेंद्र सोनवणे,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये,बोरगावचे सरपंच शकील कुरेशी,नगरसेवक मुख्तार शाह,सय्यद सरवरअली मास्टर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी नगरसेवक मुख्तार शाह,शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती रियाज पठाण,स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक पठाण,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर हुसेन सय्यद, काँग्रेस सेवा दलाचे नेते सरवरअली सय्यद,बुरहानभाई जमादार,कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नजीरभाई शेख,लोकमान्य टिळक वाचनालय व ग्रंथालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे,विद्रोही साहित्य चळवळीचे अध्यक्ष डॉ.सलीम शेख,साहिर शेख, अयाज तांबोळी,सागर दुपारी,सुभेदार सय्यद,खाजामिया कुरेशी आदि उपस्थित होते.शेवटी संयोजक नजीरभाई शेख यांनी आभार मानले.