9.6 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्य नोंदणीचे नियोजन करा – आ.संग्राम जगताप

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा ) : –राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात फॉर्म ठेवून करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असून सर्वांनी पक्ष संघटना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करावी, पक्षाचे विचार शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी विभागानुसार सदस्य नोंदणीचे नियोजन करावे आपण महायुती सरकारमध्ये काम करत आहे काश्मीर भूमीतील पीओके शब्द पुसला पाहिजे आणि अखंड भारत निर्माण होण्यासाठी हिंदुत्वाची खरी गरज आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कुठलेही शुभ कार्य करायचे असेल धार्मिकतेपासून करावे लागते, शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपती मंदिरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ केला असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी उपमहापौर गणेश भोसले, मा. स्थायी समिती सभापती अविनाश घुले, माजी अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, संभाजी पवार, महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे, कार्याध्यक्ष प्रा. अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, युवक अध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, दीपक खेडकर, शिवाजी साळवे, डॉ. रणजीत सत्रे, मळु गाडळकर, सतीश ढवण, भरत गारुडकर, विनीत गाडे, गणेश बोरुडे, आकाश दंडवते, रेणुका पुंड, मयुरी गोरे, संगीता अकोलकर, सुनंदा शिरवाळे, सुरेखा फुलपगारे, राणी भाकरे, अपर्णा पालवे, शालिनी राठोड, आरती उफाडे, सुनंदा कांबळे, मंजुषा शिरसाठ, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

शहराची राज्यामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी करणार- जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर 

शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करत आहोत, आता महापालिकेत निवडणूक येणार असून या ठिकाणी महायुतीची सत्ता आणायची आहे, तरी कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी करावी, मनपा निवडणुकीमध्ये सदस्य नोंदणीचा विचार केला जाणार आहे नगर शहराची राज्यामध्ये सर्वात जास्त सदस्य नोंदणी करणारा असून एक लाखाचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!