कोल्हार दि.९ (प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आलेली होते. याप्रसंगी कोल्हार येथील प्रथित यश प्रसूती तज्ञ डॉ. मृणाल खर्डे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना खर्डे म्हणाल्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी प्रथम प्राधान्याने घेणे आवश्यक आहे . संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी महिला अतिशय मेहनतीने आणि प्रामाणिकपणे पार पाडीत असतात .हे करीत असताना स्वतःच्या आरोग्याकडे आणि मनोरंजनाकडे दुर्लक्ष करतात .
त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर आणि मनावर होतात. प्रत्येक महिलेने आपल्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. समाजामध्ये आजही काही रूढीपरंपरांचा, गैरसमजुतींचा मोठ्या प्रमाणावर पगडा दिसून येतो आणि त्याचे परिणाम महिला भोगताना दिसतात . महिलांनी आता घराबाहेर पडले पाहिजे आणि नवनवीन गोष्टी माहिती करून घेऊन आपले आरोग्य आणि मन उत्तम राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायत च्या सरपंच सौ निवेदिता ताई बोरुडे यांचे देखील याप्रसंगी मनोगत व्यक्त केले .त्यांनी गावातील महिलांनी घराबाहेर पडून वेगवेगळ्या कार्यक्रम ,समारंभ ,संघटना मध्ये भाग घेऊन पुढे आले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे प्राचार्य श्री सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक करून महिला दिनाचे महत्त्व विशद केले आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या आरंभीस विद्यार्थिनींनी जगातील आदर्श महिलांचे वेशभूषा परिधान करून त्यांच्या कार्याची महती उपस्थितांसमोर मांडली .उपस्थित महिलांची याप्रसंगी डॉ मृणाल खर्डे यांचे वतीने रक्तगट तपासणी आणि हिमोग्लोबिन चाचणी मोफत करण्यात आली. बहुसंख्य महिलांनी आपल्या रक्ताची तपासणी करून घेतली.
रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण बघून महिलांना मार्गदर्शन केले जाईल असे डॉक्टर मृणाल खर्डे यांनी सांगितले. कार्यक्रम प्रसंगी सर्व महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला . कार्यक्रमप्रंसगी सौ प्राजक्ता कडसकर, सौ सुनीता नवले यांनी आपले विचार मांडले. उपस्थित सर्व महिलांना अल्पोपहार देण्यात आला आणि मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जया खर्डे आणि सौ.कविता दळे यांनी केले तर आभार सौ.उल्का आहेर यांनी मांनले .