5.4 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाडीबीटी अंतर्गत महिला शेतकरी प्रतिनिधींना ट्रॅक्टरचे वितरण, बचत गटातील महिलांना मंजुर झालेल्‍या कर्जाचे धनादेश आणि शिवण काम प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्‍या हस्ते

आश्वी दि.८( प्रतिनिधी):-लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी यंदाचे वर्ष हे आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर गावाचे नेतृत्‍व करणा-या महिलांनी तृणधान्‍य उत्‍पादनामध्‍ये योगदान देवून गावाच्‍या अर्थकारणाला नवी दिशा देण्‍याचा प्रयत्‍न करावा असे अवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

आश्‍वी येथील लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान,वाणिज्य आणि संगणक महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात त्‍यांनी महिलांशी संवाद साधला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृण धान्य वर्षाच्‍या निमित्‍ताने महाडीबीटी अंतर्गत महिला शेतकरी प्रतिनिधींना ट्रॅक्टरचे वितरण, बचत गटातील महिलांना मंजुर झालेल्‍या कर्जाचे धनादेश आणि शिवण काम प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.
आजच्या परीस्थीतीत महीलांनी सर्वच क्षेत्रामध्ये यश सिध्‍द केल्याचे पाहायला मिळते. व्यक्तिगत किंवा आपल्या आवडत्या क्षेत्रात यशाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी दररोज कष्ट आणि कठोर परीश्रम घेणा-या महीलांचे कौतुक महिला दिनाच्‍या निमित्‍ताने केलेच पाहीजे असे सांगून सौ.विखे पाटील म्‍हणाल्‍या की, एकीकडे संसाराचा गाडा पुढे नेतानाच गावाच्या विकासाचा रथही आपल्याला ओढायचा आहे. पण जी महीला यशस्वी संसार करू शकते ती गावचा कारभार सुध्दा यशस्वी करून दाखवू शकते कारण तिच्यात आत्मविश्वास असतो यासाठी सरपंच पदावर निवडून आलेल्‍या महिलांनी आदर्श काम करण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. 
 याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघूते, कांचन मांढरे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ अलका दिघे, प्रवरा बँकेच्या संचालिका मंगल वाणी, जोर्वेच्या सरपंच प्रीती दिघे, कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे, रहिमपूरच्‍या सरपंच सविता शिंदे, मालुंजेच्‍या सरपंच सुवर्णा घुगे, कनाकापूरच्या सरपंच ज्योती पचपिंड, निंभाळेच्‍या सरपंच भगीरथी काठे, औरंगपूरच्या सरपंच लक्ष्मीबाई वाकचौरे, सुजाता थेटे, वैशाली मैड, छाया बडे, मंगला वाणी, बचत गट समनव्यक पाटील, प्राचार्य डॉ.राम पवार, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पोलिस अधिकारी संतोष भंडारे, सचिन शिंदे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, बचत गटातील महिला, विद्यार्थी उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांचा गौरव सौ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, तुम्ही गावाचे, समाजाचे प्रतिनिधीत्व करता तेव्हा तुमची जबाबदारी निश्चित वाढली आहे. गावाच्या पायाभूत सुविधां पासून ते गावाच्या अर्थकारणाला नवी दिशा आणि स्थिरता कशी आणता येईल याचा विचार आपण केला पाहीजे. यंदाच्या आंतराष्ट्रीय महीला दिनाला सुध्दा वेगळी पार्श्वभूमी आहे.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ.सारीका रोहमारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा.व्ही.एस शिंदे, प्रा.एस.आर पाचोरे यांनी तर आभार डॉ. प्राजक्ता खळकर यांनी मानले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!