लोणी दि.४ (प्रतिनिधी):–प्रवरेच्या माध्यमातून पारंपारीक शिक्षणासोबत दर्जेदार शिक्षणाची परंपरा जपली आहे. प्रवरेचा विद्यार्थी हा देश आणि परदेशात कार्यरत असतांना प्रवरेच्या मातीचे संस्कार विद्यार्थी जपत आहेत. शिक्षणातून सक्षम होत असताना आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन जातांना पालकांच्या विश्वासाला तडा जावू देऊ नका असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनीतिई विखे पाटील यांनी केले.
प्रवरेच्या माध्यमातून पारंपारीक शिक्षणासोबत दर्जेदार शिक्षणाची परंपरा जपली आहे-शालिनीताई विखे पाटील
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तंञतिकेतन लोणीच्या वार्षिक सम्मेलन आणि दर्पण २०२३ निमित्त आयोजित कार्यक्रमात सौ विखे पाटील बोलत होत्या. यावेळी जाबिल इंडीया प्रा. ली. पुणेच्या आस्थापना विभागाचे प्रमुख गुंडुराव पाटील, इंजिनिअर जाबिल कंपनी, पुणे येथील सोपानराव आहेर, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डाॅ.व्ही. आर. राठी, माजी विद्यार्थी श्री.ज्ञानेश्वर निबे, सौ नितु खेडकर, सौ योगिता गायकवाड, श्री.रविंद्र अष्टेकर, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष श्री.दिंगबर शिरसार, अतांत्रिक पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर महाविद्यालय विद्यार्थी कु.श्रध्दा काकडे, श्री.सलमान सय्यद, कु.खुशी वाबळे, कु.सायली लगड आदी उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शात सौ.विखे पाटील म्हणल्या, ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षण पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केल्याने आज शेतकरी आणि सामान्य जनतेची मुले देश आणि परदेशात पोहचल्याने हा आनंद मोठा आहे. कोरोनानतंर देश पुढे जात असतांना विविध कार्यक्रमातून विद्यार्थ्याना मोठी प्रेरणा मिळत आहे. ध्येय निश्चित करा ध्येय पुर्ण करण्यासाठी जिद्द ठेवा यश मिळतेचं असे सौ विखे पाटील यांनी सांगून पुस्तकी ज्ञान आणि अनुभवी शिक्षण यांतून स्वता:ला घडवा आणि आपला परिवार ही घडवा. प्रवरेने नेहमीचं कला गुणांना संधी दिली आहे पुढे यातून पुढे जा हा संदेश दिला.
प्रारंभी प्राचार्य डॉ. व्ही. आर.राठी यांनी तंत्रनिकेतच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी गुंडगाव पाटील, सोपान आहेर यांनीही मार्गदर्शन केले. अहवाल वाचन श्रद्धा काकडे, सलमान सय्यद यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविंद्र काकडे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा. एम. एम गरड यांनी मानले यावेळी वार्षिक पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले.
….
प्रवरा शैक्षणिक संकुल आणि माजी विद्यार्थी हे अतूट नाते आहे.शिक्षणासोबतचं औद्योगिक क्षेञाला लागणारे कौशल्य प्रवरा देते.महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुशल असे मनुष्यबळ निर्माण होते.पुणे तेथे काय उणे असे असले तरी ज्याला नाही कुणी त्याला लोणीप्रवरा हा प्रत्यय ही येतोय.