आश्वी( जनता आवाज वृत्तसेवा):-परीसरातील नागरीकांची सोय व्हावी हीच भूमिका महसूल विभागाची आहे. यातून ग्रामीण भागातील लोकांना शासकीय व्यवस्थेची मदत वेळेत होवू शकेल. यांनी हे कार्यालय सुरू झाले तर वयोवृध्द आणि महीलांना संगमनेरला येण्याचा त्रास वाचेल स्थानिक पातळीवर योजनांची माहिती घेणे महीला, महाविद्यालयीन विद्यार्थीना सोपे होईल असे मत पद्मश्रीं डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे म्हणाले आहेत.
आश्वी बुद्रूक येथील अप्पर तहसिल कार्यालय तातडीने सुरू करून या भागातील ग्रामस्थ शेतकरी महीला विद्यार्थ्यांची अडचण दूर करा,अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचक्रोशीतील नागरीकांनी निवेदनाद्वारे प्राधिकार्यांना दिला आहे. आश्वी बुद्रूक येथे सुरू होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयाला केवळ राजकीय भूमिकेतून विरोध केला जात असून,हे कार्यालय ताताडीने सुरू न झाल्यास आंदोलन तसेच कायदेशीर लढाई करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आश्वी आणि पंचक्रोशीतील गावांना संगमनेर तहसिल कार्यालय मोठ्या अंतरावर असल्याने सर्व शासकीय किंवा योजनांच्या कामासाठी शेतकरी महीला विद्यार्थ्यांना संगमनेर येथे जावे लागते.नागरीकांच्या सोयीसाठी अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचे धोरण महसूल विभागाने घेतल्याचा मोठा दिलासा या भागातील ग्रामस्थांना मिळणार असल्याची भूमिका शिष्टमंडळाने प्रशसानापुढे मांडली.
मात्र अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्यास जाणीव पुर्वक विरोध करून एकप्रकारे या गावांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.कोणाच्याही विरोधाला न जुमानता आश्वी बुद्रूक येथील अप्पर तहसिल कार्यालय सुरू करावे,आश्वी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याच्या मागणीची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.
पद्मश्री डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे प्रवरा बँकेचे व्हा चेअरमन मच्छिंद्र थेटे निवृत्ती सांगळे नारायण कहार, अँड रोहिणी निघुते गीताराम तांबे भगवानराव इलग संजय गांधी अशोकराव म्हसे भाऊसाहेब जऱ्हाड, कारभारी म्हसे भाऊसाहेब लोखंडे संजय सातपुते सुनिल डेंगळे सुरेश भुसाळ पंढरीनाथ अनर्थे भिमा बुधे अशोक जोशी हौशीराम तांबे बापुसाहेब गायकवाड यासह आश्वी खुर्द आणि बुद्रुक निमगावजाळी चिंचपूर प्रतापपूर दाढ खुर्द उंबरी ओझर ग्रामस्त उपस्थित होते.
पुर्वी पेशवे काळात तहसिल कार्यालय होतेच.नंतरच्या काळात खरेदी विक्रीचे कार्यालय सुरू करून प्रशासनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न यापुर्वी महसूल विभागाने केला असल्याचे सांगितले. सामान्य माणसाच्या हिताचा विचार करा.शासकीय कार्यालयातील सेवा वेळेत मिळाल्यातर लोकांना दिलासा मिळेल.पुर्वीची प्रशासकीय व्यवस्था पाहीली तर आश्वी येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू होणे गैर नाही.
-भाऊसाहेब जऱ्हाड(संचालक,प्रवरा शिक्षण संस्था)



