कोल्हार (प्रतिनिधी):-राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संपदा फौंडेशन च्या ” गुरुकुल संपदा” शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन, वैज्ञानिक रांगोळी, प्रश्न-मंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली. प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक श्री. सुधीर आहेर सर व संचालिका सौ. सारिका आहेर यांच्या हस्ते सर सी. वी. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले गेले. या प्रसंगी श्री. सुधीर आहेर सरांनी विद्यार्थ्यांना ‘छोटे शास्रज्ञ’ संबोधत नवनवीन गोष्टी शिकावे तसेच विद्यार्थ्यांनी कृतिशील बनावे असे आवाहन केले.
शाळेतील इयत्ता पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगकृती मांडलेल्या होत्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक प्रयोगांना भेट देऊन त्याची माहिती जाणून घेतली.
प्रश्न-मंजुषा स्पर्धेमध्ये डॉ. ए. पी. जे. कलाम संघाने प्रथम क्रमांक, छत्रपती शिवाजी महाराज संघाने द्वितीय क्रमांक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघाने तृतीय क्रमांक मिळवला, तसेच वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेत कु. सिमरन शेख आणि कु. सानिध्य निबे (इ. ९ वी) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक, कु. गौरी योगेश घोडे(इ.७वी) हिने द्वितीय क्रमांक आणि कु. पलक संदीप रांका हिने तृतीय क्रमांक मिळवला आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता १ली ते ४ थी गटात कु. लोढा सम्यक (इ.१ ली ) या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक, कु. गिरमे राजवीर आशिष(इ.१ली) याने द्वितीय क्रमांक आणि कु. रित्विक स्वप्नील शिरसाठ (इ.३री) याने तृतीय क्रमांक मिळवला. इयत्ता ५वी ते ९ वी गटात कु.सई सचिन कडसकर(इ. ८वी) हिने प्रथम क्रमांक, कु.आर्या निखिल खर्डे(इ. ७वी) व कु.चित्ते देवश्री पंकज(इ . ५वी) यांनी द्वितीय क्रमांक आणि कु. ओंकार केशव किरदात (इ. ६वी) याने तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.