6.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

करियर कट्टा स्पर्धेत गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे यश तीन पुरस्कार मिळत महाविद्यालय ठरले अव्वल

लोणी दि.२८ (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती  तंत्रज्ञान कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करियर कट्टा” महाविद्यालयीन स्पर्धा २०२२- २३ मध्ये लोकनेते पद्यदुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे, गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयास उत्कृष्ट जिल्हास्तरीय 
महाविद्यालय- तृतीय, उत्कृष्ट राज्यस्तरीय प्राचार्य- 
तृतीय, उत्कृष्ट महाविद्यालयीन समन्वयक, अहमदनगर जिल्हा- गायत्री गहिरे-  द्वितीय असे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनुश्री खैरे यांनी दिली.
     करिअर कट्टा या उपक्रमाच्या वर्धापनदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयांचा, प्राचार्यांचा व समन्वयकांचा सन्मान के .जे.सोमय्या महाविद्यालय, विद्या विहार, मुंबई येथे करण्यात आला. या प्रसंगी  उच्च व तंत्रशिक्षण विभागचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे , के जे सोमय्या महाविद्यालय प्राचार्या प्रज्ञा प्रभू , पॉवर सेक्टर स्किल कोन्सिल, नवी दिल्ली  सचिव प्रफुल्ल पाठक आदींच्या उपस्थित सन्मान करण्यात आला. 
    गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालय हे लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर कॅम्पस मध्ये असून आतापर्यंत दोन वेळा नँक झालेलं आहे. गृहविज्ञान विभागाची फुड्स अँड नुट्रीशन आणि वस्त्र शास्त्र आणि डिझायनिंग याविषयी पदवी अभ्यासक्रम चालतो, तसेच हेल्थ सायन्सचा डायटेटिक्स, संगणक विभागाचा बीसीए आणि एम एसी कॉम्प्युटर अप्लिकेशन हे अभ्यासक्रम चालतात. मागील वर्षांपासून उद्योजगता आणि स्पर्धा परीक्षाचें मार्गदर्शन मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती  तंत्रज्ञान कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “करियर कट्टा” साठी १०६ मुलींची नोंदणी केली. आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित केल्या. करियर कट्टा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध सर्टिफिकेट कोर्सेसचा फायदा मुलींनी घेतला. त्यामुळेच हे यश महाविद्यालयास मिळाले अशी माहिती प्रा. गायत्री गहिरे आणि कुमुदिनी गोंधळी, समन्वयक, करियर कट्टा यांनी दिली.
  महाविद्यालयाच्या या यशाचे महसुल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील,खा. डाॅ.सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!