मुंबई येथील अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेन इंजिनीरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. उल्हासकुमार गोखले, जिएचआरआयईटी, नागपूर संचालक डाॅ.विवेक कपूर यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाच्या अंतर्गत त्यांनी एमआरआय इमेज वापरून अर्ली स्टेजमधील सर्व्हिकल स्पॉन्डिलायसिसचे डिटेक्षण करण्यासाठी नवीन प्रकारचा डीप डेन्स सीएनएन अल्गोरिदम डेव्हलप केला आहे. त्याचा उपयोग ऍडव्हान्स टेलिम्याटिक्स मध्ये होणार आहे. सर्व्हिकल स्पॉन्डिलायसिसचे डिटेक्षण करण्यासाठी त्यांचा शोध डॉक्टरांसाठी उपयुक्त पडेल. डॉ. पंकज प्रमोद चित्ते हे कोल्हार येथील आहेत. ते जिल्हा परिषदेतील शिक्षिका सौ. उषा प्रमोद चित्ते व मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटी निवृत्त अधिकारी श्री प्रमोद अंबर चित्ते यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या संशोधन कार्यास त्यांच्या परिवाराचे, डॉ. निरजकुमार सथावने, डॉ. सुनील लोंढे आणि प्रा. मच्छिंद्र गायकर यांचे सहकार्य लाभले. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल महसूल आणि संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पीएचडी पूर्ण केल्याबद्दल डॉ पंकज प्रमोद चित्ते यांचा सत्कार केला यावेळी पद्यश्री डाॅ.विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष डाॅ.भास्करराव खर्डे पाटील, संचालक श्री. स्वप्नील निबे पाटील, श्री. धनंजय दळे पाटील, व भगवती माता मंदिराचे विश्वस्त श्री. श्रीकांत खर्डे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर इंजिनीरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. सौ. सीमा लाव्हाटे, डॉ. सतीश तुरकने, प्रा. स्वप्नील बंगाळ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्था यांनी अभिनंदन केले.
प्रा. पंकज चित्ते यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठची पीएचडी प्रदान
लोणी दि.२७ (प्रतिनिधी):–लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थाच्या
प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉप्युटर इंजिनीरिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.पंकज प्रमोद चित्ते यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठातर्फे पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी “डिझाईन अँड डेव्हलपमेंटऑफ मशीन लर्निंग अल्गोरिदम फॉर अन्यालिसीस अँड डिटेक्शन ऑफ सर्व्हिकल स्पॉन्डिलायसिस ” या विषयावर शोधनिबंध सादर केला होता.