टाकळीभान( वार्ताहर ):- परिक्षेची भिती न बाळगता
परिक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे. दहावी हा विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील शेवटचा टप्पा असल्याने विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून दहावी परिक्षेत घवघवीत यश संपादन करून आई, वडील व
विद्यालयाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य बी टी इंगळे यांनी केले.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य
बापूसाहेब पटारे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राहुल पटारे, मंजाबापु थोरात, प्राध्यापक डॉ.बाबुराव उपाध्ये, प्राध्यापिका श्रीमती मालपाठक, कवी पोपटराव पटारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पाराजी पटारे, देवनाथ पाबळे,भाऊसाहेब बनकर, वबाळासाहेब बनकर, विद्यालयाचे पर्यवेक्षक ए डी बनसोडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावीचे विद्यार्थी दर्शन मगर, विवेक शिरसाठ सुदर्शन तर्हाळ, निकिता भवार, दिशा गिते, स्नेहल अबूज, धीरज बनकर, दिव्या कोकणे, संदिप पडवळ तसेच प्रा. बाबूराव उपाध्ये, प्रा. श्रीमती मालपाठक तर शिक्षक ए ए पाचपिंड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी रितिका काम्पुटरच्या वतीने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रिसिट ठेवण्यासाठी पाऊचचे वाटप इन्स्टिट्युटच्या संचालिका मालिनी भाऊसाहेब बनकर यांनी केले. देवनाथ पाबळे यांनी विद्यालयाची गरज ओळखून दोन पंखे विद्यालयास भेट दिले तर भाऊसाहेब व बाळासाहेब बनकर यांनी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैजयंती सोनवणे यांनी केले. तर आभार एस.जी.काळे यांनी मानले.