6.1 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img
spot_img

धाडसी महिलेचा शासनस्तरावर सन्मान करण्यासाठी प्रयत्न करणार-आ. खताळ जागतिक महिलादिनी आ अमोल खताळ यांनी केला धाडसी महिलेचा सन्मान

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):- एका धाडसी महिलेने आपल्या जीवाची परवा न करता बिबट्याशी तब्बल अर्धा तास झुंज देत बिबट्याच्या तावडीतून सुटका करत प्राण वाचविले. त्या धाडसी महिलेचा जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्याच्यावतीने सन्मान केला आहे. या महिलेचा सन्मान शासन स्तरावरती सन्मान व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदू दुधवडे या मेंढपाळावरती दोन दिवसापूर्वी हल्ला केला होता.या हल्ल्यात दुधवडे हे जखमी झाले होते.त्यांच्यावरती कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे आ. अमोल खताळ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. बिबट्याशी झुंज कशी दिली याची सर्व थरार त्या धाडसी महिला नंदा दुधवडे आणि त्यांचे पती चंदू दुधवडे यांनी आ अमोल खताळ यांच्यासमोर सांगितला हा सर्व अनुभव ऐकून आमदार खताळ यांच्यासह सर्वांच्याच अंगावरती शाहारे उमटले होते.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नंदा दुधवडे या महिलेच्या धाडसाचे आ अमोल खताळ यांनी कौतुक करत त्या महिलेचा सन्मान केला.बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले ल्या चंदू दुधवडे यांच्या दवाखान्याचा खर्च वनविभागाने तातडीने मंजूर करून त्यांना देण्यात यावा तसेच या बिबट्याच्या हल्ल्यात दुधवडे यांच्या २ मेंढ्या ठार तर ४ मेंढ्या जखमी झाल्या होत्या .त्याचाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावा अशी सूचना आ आमोल खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या वेळी दिल्या

यावेळी आ अमोल खताळ यांच्या समवेत शिवसेनेचे तालुकाप्रमुखरामभाऊ राहाणे रमेश काळे कुटे हॉस्पिटलचेप्रमुख प्रदीप कुटे चंदनापुरी ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहाणे श्याम राहणे वनरक्षक विक्रांत बुरांडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!